क्राईम

नात्याला काळिमा! तरुणाने आपल्याच सख्ख्या बहिणींना केले वासनेचे शिकार, आईवरही बलात्काराचा प्रयत्न

रांची : झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यातून माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केला. मुलींना वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही या नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर आरोपीने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना लोहरदगा जिल्ह्यातील न्यू आझाद बस्तीमधील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गॅरेजमध्ये मोटार मेकॅनिक म्हणून काम करतो. त्याच्या घरात आई-वडील आणि त्याच्या दोन बहिणी आहेत. मोठी बहीण 19 वर्षांची आहे, तर धाकटी 16 वर्षांची आहे. रिपोर्टनुसार, आरोपी गेल्या 3-4 वर्षांपासून सतत त्याच्या लहान बहिणीवर बलात्कार करत होता. बुधवारी (२७ एप्रिल २०२२) त्याची मोठी बहीण आंघोळ करून स्वयंपाकघराकडे जात असताना आरोपीने तिच्यावरही बलात्कार केला. घटनेदरम्यान मोठ्या बहिणीच्या किंकाळ्या ऐकून धाकटी बहीण खोलीत पोहोचली आणि दुष्ट भावाच्या तावडीतून तिला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानंतर आरोपीने तिला चाकू दाखवून गप्प केले. दरम्यान, मुलींचा आवाज ऐकून आरोपीची आईही तेथे पोहोचली, तेव्हा आरोपी पूर्णपणे नग्न अवस्थेत होता आणि तो आपल्याच बहिणींसोबत घाणेरडे कृत्य करत होता. त्याच्या आईने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा या विकृत मुलाने तिच्यावरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याने कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

दरम्यान, या घटनेमुळे दुखावलेल्या आरोपीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 376, 354, 506 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago