क्राईम

आई मुलीला शिकवत होती ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’, मग 9 वर्षीय मुलीने केला धक्कादायक खुलासा…

राजस्थान : राजस्थानमधील जोधपूरमध्ये चार वर्षांपूर्वी एका निष्पाप चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा आई तिच्या मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ म्हणजे काय हे समजावून सांगत होती तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आईच्या स्पष्टीकरणानंतर मुलीने असा काहीसा प्रकार सांगितला जो ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीने सांगितले की, चार वर्षांपूर्वी शाळेत तिच्यासोबत अशाच चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या.

9 वर्षीय मुलीने तिच्या आईला सांगितले की, 26 फेब्रुवारी 2018 रोजी ती शाळेतील वार्षिक कार्यक्रमासाठी नृत्याचा सराव करत होती. यावेळी शाळेतील डान्स टीचरने तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केले. प्रॅक्टिस सुरू असताना तिला बाथरूममध्ये नेऊन शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार मुलीच्या आईला समजताच तिने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेथे तिने आपल्या मुलीसोबत घडलेल्या या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आणि तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली. आरोपी डान्स टीचरवर तातडीने कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस तक्रारीत मुलीने सांगितले की, जेव्हा शिक्षकाने तिच्यासोबत हे घाणेरडे कृत्य केले तेव्हा तिला त्याबद्दल धमकावले होते. शिक्षकाने मुलीला घाबरवले आणि सांगितले की जर तिने हे कोणाला सांगितले तर तो तिला मारून टाकेल. हे ऐकून मुलगी घाबरली आणि तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

मुलीच्या आईने सांगितले की, तिची मुलगी त्या दिवसापासून खूप घाबरलेली असायची. याविषयी तिने कधीही कोणाला काही सांगितले नाही. ती अनेकदा डोकं दुखत असल्याचं म्हणायची. ती स्वतःतच हरवलेली असायची. अनेकवेळा मुलीला डॉक्टरांकडे देखील नेले, मात्र काहीही निदान झाले नाही. मग एके दिवशी तिने स्वत:च तिच्या मुलीला जवळ बसवले आणि ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बद्दल सांगितले. त्यानंतर मुलीने हा धक्कादायक खुलासा केला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago