man tied to a chair and burnt alive
तामिळनाडू : 38 वर्षीय महिलेने प्रेम सिद्ध करण्यासाठी आपल्याच मुलीचा जीव घेतल्याची भयंकर घटना घडली आहे. महिलेने तिसरे लग्न केले होते आणि दुसऱ्या लग्नातून तिला एक मुलगीही होती. पतीने महिलेला तिचे प्रेम सिद्ध करण्याचे आव्हान दिल्याने या महिलेने आपल्याच मुलीला जिवंत जाळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता 75 टक्के भाजली आणि तिचा जीव वाचू शकला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री घडली. पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. यावेळी पतीने पत्नी जया लक्ष्मीला आपली निष्ठा सिद्ध करण्यास सांगितले. त्यानंतर पतीला प्रेमाचे सत्य सिद्ध करण्यासाठी ती मूर्खपणाच्या गोष्टी बोलण्यास सुरुवात केली. जया लक्ष्मी म्हणाली कि, जर माझे प्रेम खरे असेल तर माझ्या मुलीचे आग देखील काही बिघडवणार नाही. यानंतर ती खोलीत गेली आणि झोपलेल्या मुलीला घेऊन आली. तिने रॉकेल ओतून मुलीला पेटवून दिले. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. यावेळी मुलगी खूप जास्त भाजली होती. लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु, मुलगी 75 टक्के भाजली होती, तिचे प्राण वाचू शकले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, जया लक्ष्मीचे पहिले लग्न वयाच्या 19 व्या वर्षी झाले होते. तिच्या पतीचे नाव पलवान होते. यानंतर जयाने आपल्या दिराशी लग्न केले आणि पलवानला सोडून दिले. काही दिवसांनी तिची घटस्फोटित ड्रायव्हर पद्मनाभनशी मैत्री झाली आणि त्यांनी लग्न केले. 9 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुले आहेत.
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…