The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
लखनौ : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात ७५ वर्षीय पतीने ६५ वर्षीय पत्नीची हत्या केली. आरोपी पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर खाटेखाली लपून बसलेल्या आरोपी पतीला अटक केली.
असोथर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 75 वर्षीय पतीने आपल्या 65 वर्षीय पत्नीची हत्या केली आणि नंतर खाटाखाली लपून बसला. सकाळी ग्रामस्थ घराजवळून जात असताना त्यांना महिलेचा मृतदेह खाटेवर पडलेला दिसला. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठच्या सुमारास शिवबरन हे जेवण करून घराबाहेरील व्हरांड्यात झोपले होते. त्यांची पत्नीही बाजूलाच खाटेवर झोपली होती. पत्नी झोपेत असताना आरोपीने तिच्या डोक्यावर व मानेवर कुऱ्हाडीने अनेक वार केले, त्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी शेजारी तिथून जात होते, त्यावेळी त्यांना शिवबरन खाटाखाली लपलेले दिसले. त्यानंतर ते खाटेजवळ आले असता वृद्ध महिलेचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले. त्यानंतर गावकऱ्यांनी घरात झोपलेल्या मुलाला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
चौकशीत आरोपी पतीने सांगितले की, त्याची पत्नी कोणाच्या तरी घरी जायची, नंतर तोदेखील तिच्यासोबत जायचा आणि त्याच गोष्टीवरून दोघांमध्ये दररोज वाद आणि मारहाण होत असे. त्यामुळे त्याने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. त्यांना सात मुले आहेत, त्यापैकी पाच विवाहित आहेत. पोलिस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, असोथर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सरवल गावात पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले, तपासादरम्यान असे आढळून आले की तो आपल्या पत्नीवर संशय घेत असे, त्यामुळे त्याने तिचा खून केला. पोलिसांनी खून करणाऱ्या पतीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…