क्राईम

भयंकर! चालत्या कारमध्ये सहा वर्षांची मुलगी आणि तिच्या आईवर सामूहिक बलात्कार

उत्तराखंड : हरिद्वार येथील रुडकी शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका सहा वर्षांच्या मुलीवर आणि तिच्या आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पिरान कालियार येथील रहिवासी महिला आपल्या मुलीसह रात्री उशिरा कालियारहून रुडकी येथे जात असताना ही धक्कादायक घटना घडली. वाटेत या महिलेने एका कारमध्ये लिफ्ट मागितली. त्यानंतर चालत्या कारमध्ये मायलेकीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी त्यांना गंगनाहर ट्रॅकजवळ सोडून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (24 जून) रात्री उशिरा घडली. महिलेने रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या आपल्या मुलीसह पोलीस स्टेशन गाठले आणि घटनेची माहिती दिली. आई-मुलीवर सामुहिक बलात्काराची माहिती मिळताच पोलिस स्टेशनमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर मुलीची अवस्था पाहून पोलिसांनी तिला रुडकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तसेच महिलेचे मेडिकलही करण्यात आले आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्रभर आरोपींचा शोध घेतला. आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही झडती घेण्यात आली, मात्र अद्याप काहीही माहिती मिळाली नाही.

ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून पतीपासून विभक्त होऊन कालियार येथे राहते. महिलेचा पती मुझफ्फरनगर (यूपी) येथे राहतो. शुक्रवारी (24 जून) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ती आपल्या सहा वर्षाच्या मुलीला घेऊन रुडकी येथे जात होती. पिरान कालियारमध्ये तिला सोनू नावाचा एक तरुण भेटला. सोनूने महिलेला तो रुडकीला जात असल्याचे सांगितले आणि महिलेला लिफ्ट दिली. सोनूने तिला गाडीत बसवले. कारमध्ये सोनूचे काही मित्रही उपस्थित होते.

दरम्यान, कारमधील तरुणांनी चालत्या कारमध्ये महिला आणि तिच्या सहा वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केला. महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिला धमकावून गप्प केले. बलात्कार केल्यानंतर आरोपी आई व मुलीला रुळावर फेकून फरार झाले. महिलेला धक्का बसला असून कारमध्ये कितीजण होते हे अद्याप महिलेला सांगता आलेले नाही. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तैनात केली आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याचे एसपी देहाट यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने रात्रीच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शनिवारीही मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मुलीच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago