क्राईम

देश हादरला! 3 वर्षीय चिमुकलीवर स्कूल बसमध्ये बलात्कार, महिला सहाय्यकही होती उपस्थित…

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील बिलाबंग या प्रतिष्ठित शाळेतील 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बस कर्मचाऱ्यांनी केलेल्या गैरकृत्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या भयंकर बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्कूल बसच्या ड्रायव्हरने नर्सरीत शिकणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र शाळेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शाळेचा निष्काळजीपणाही समोर आल्याचे सांगितले. आता तपासानंतर जे पुरावे सापडतील त्यानुसार शाळेवर कारवाई केली जाईल. शाळेने या लाजिरवाण्या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. घटनेचा तपास सुरु आहे. गृहमंत्र्यांनी पुढे सांगितले की, भोपाळच्या शाळेशी संबंधित घटनेत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून तपासात ते दोषी आढळले आहेत. मात्र शाळा व्यवस्थापनावरही कारवाई केली जाईल.

पोलिस काय म्हणाले?
भोपाळचे पोलिस आयुक्त मकरंद देउस्कर यांनी सांगितले की, मुलगी शाळेतून परतली तेव्हा तिच्या आईने पाहिले की कोणीतरी तिच्या बॅगेत ठेवलेल्या अतिरिक्त सेटमधील मुलीचे कपडे बदलले आहे. यानंतर आईने आपल्या मुलीच्या वर्गशिक्षिका आणि शाळेच्या मुख्याध्यापकांकडे चौकशी केली, मात्र दोघांनीही मुलीचे कपडे बदलले नसल्याचे सांगितले. दरम्यान, पीडित चिमुकलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेतले आणि तिचे समुपदेशन केले, त्यानंतर तिने सांगितले की बस चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिचे कपडे देखील बदलले.

पोलिस आयुक्तांनी सांगितले की, पालक तक्रार करण्यासाठी दुसऱ्या दिवशी शाळेत अधिकाऱ्यांकडे गेले, मुलीने आरोपी ड्रायव्हरला देखील ओळखले. धक्कादायक बाब म्हणजे, त्यावेळी महिला मदतनीस बसमध्ये उपस्थित होती. सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) निधी सक्सेना यांनी सांगितले की मुलीच्या पालकांनी सोमवारी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. एसीपी म्हणाले की, बस चालक आणि महिला मदतनीस यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६-एबी (१२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचे नेमके ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडितेच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago