court order
नवी दिल्ली : एकतर्फी प्रेमातून मामीची हत्या करणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या मित्राला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींनी चाकूने भोसकून त्यांची हत्या केली होती. जिल्हा न्यायालयाने दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून प्रत्येकी दहा हजार रुपये दंड जमा करण्याचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास आणखी कारावास भोगावा लागेल.
सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रोहतश शर्मा यांनी सांगितले की, गामा-1 सेक्टरमधील अभियंता पंकज त्यागी यांनी तत्कालीन कासना (सध्या बीटा-2) पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. 24 जुलै 2013 रोजी पंकज आणि त्याचा मेहुणा ड्युटीवर गेले होते, यावेळी पंकज यांची पत्नी नेहा त्यागी आणि सहा महिन्यांचा मुलगा घरी होते. ते दुपारी घरी परतले, तेव्हा त्यांना नेहाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. याप्रकरणी तक्रार नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी असा दावा केला होता की एकतर्फी प्रेमातून नेहाचा भाचा आकाश उर्फ गोलू आणि त्याचा मेरठचा मित्र अंकुश उर्फ राहुल शर्मा या दोघांनी नेहा यांची हत्या केली होती.
काय आहे प्रकरण?
नेहा खूप आनंदी राहायची आणि ती अनेकदा तिचा नवरा, भाऊ आणि भाचा आकाशसोबत फिरायला जायची. पण आकाशला वाटले की हे प्रम आहे. आकाशने 24 जुलै रोजी नेहाच्या घरी जाऊन तिच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता. यावर नेहाने आरोपीच्या कानशिलात लगावली होती. नेहाने त्याला फटकारले आणि म्हणाली की मी तुला भावासारखं समजते. यामुळे आरोपी घाबरला की नेहा ही गोष्ट घरच्यांना सांगेल. यानंतर आकाश अंकुशसोबत ऑटोमध्ये सुरजपूरला पोहोचला आणि येथून एक चाकू विकत घेतला. नेहाच्या घरी पोहोचताच दोघांनी चाकूने हल्ला करून नेहाची हत्या केली.
नेहाची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या सहा महिन्यांच्या मुलाचे तोंड बांधून त्याला दुसऱ्या खोलीत सोडले होते, असा खुलासा पोलिसांनी केला आहे. ही दरोड्याची घटना भासवण्यासाठी आरोपींनी घरातील आवश्यक कागदपत्रे, मामीचा मोबाईल, डेबिट कार्ड आदी साहित्य घेऊन कपडे व इतर वस्तू इकडे-तिकडे फेकून दिल्या होत्या. घटनेनंतर आरोपी घरी परतले आणि त्यांनी इतर कुटुंबीयांसह शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली. आरोपी कुटुंबासह पोलिस ठाण्यात जाऊन खुलासा करण्याची मागणी करत अत्यंत आक्रोश दाखवत होता.
आरोपीने आपले कपडे बाथरूममध्ये टाकून पंकजचे कपडे घातले होते, या कपड्यांमध्ये बसचे तिकीट पडलेले आढळून आले. त्यावरून पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.या खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून दोघांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…