gangrape minor girl 15 year old girl in uttar pradesh
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही १५ वर्षीय मुलगी घरी एकटी असल्याचे पाहिल्यानंतर 5 जणांनी बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एएसपी, सीओ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली.
ही घटना हरदोईच्या सांडी परिसरातील खेड्यात घडली आहे. पीडित मुलीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, 15 जून रोजी घरातील सर्वजण चुलत्याच्या मुलाच्या लग्नासाठी गेले होते. त्याच्या आईचे निधन झालेले असून वडील रोडवेज बस चालक आहेत. घटनेच्या वेळी त्याची बहीण घरी एकटीच होती. गावातील पाच जणांना ती घरात एकटी असल्याचे समजले. त्यानंतर ते घरात घुसले आणि बंदुकीचा धाक दाखवत या मुलीला घेऊन गेले. हे सर्वजण तिला एका शेतात घेऊन गेले आणि तेथे पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा सगळे कुटुंबीय लग्न झाल्यानंतर घरी परतले, तेव्हा पीडितेने त्यांना घटनेची माहिती दिली.
पीडित मुलीच्या भावाने सांगितले की, पाचही तरुणांनी त्याच्या बहिणीला धमकी दिली होती की जर तिने या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तिला आणि सर्व कुटुंबियांना ठार मारू. त्यामुळे त्याची बहीण खूप घाबरलेली आहे. त्याने पुढे सांगितले की ते सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत आणि ते गुन्हा नोंदवल्यास संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत आहेत.
दरम्यान, एएसपी अनिल कुमार यादव यांनी सांगितले की सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवून घेतला आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
रागाच्या भरात तरुणाने बहिणीची गोळ्या घालून केली हत्या, कारण…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…