क्राईम

लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे घडलं मोठं हत्याकांड, माथेफिरूने संपूर्ण कुटुंबच संपवलं…

उत्तर प्रदेश : अमेठीमध्ये गुरुवारी एका शाळेतील शिक्षकाच्या संपूर्ण कुटुबांची हत्या एका माथेफिरूने केली.  हे धक्कादायक प्रकरण प्रेमप्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून चंदन वर्माची ओळख पटवली असून शिक्षकाची बायको आणि चंदन एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षक सुनील कुमार (३४) यांना १८ ऑगस्ट रोजी त्यांच्या पत्नीच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली होती. चंदन त्यांच्या कुटुंबाला त्रास देत होता. त्यामुळे त्यांनी पत्नीला चंदनविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवायला सांगितले. चंदनने कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप एफआयआरमध्ये केला गेला. तसंच, आमच्या कुटुंबाला कोणतीही इजा झाल्यास चंदनला जबाबदार धरण्यात यावं, असंही तक्रारीत नमूद केलेलं होतं. ही तक्रार केल्यानंतर शिक्षकाची पत्नी आणि चंदन एकमेकांच्या संपर्कात नव्हते. परंतु, काही दिवसांनी चंदनने त्यांच्या कुटुंबाला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. सुनील यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांच्या पत्नीचे चंदनबरोबर प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी चंदनने सुनील यांच्या घरी जाऊन सुनील, त्यांची पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली. त्याने सुनील यांना तीन, त्यांच्या पत्नीला दोन आणि दोन्ही मुलींना प्रत्येकी एक गोळी झाडली. धक्कादायक बाब म्हणजे या माथेफिरूने हत्या करण्यापूर्वी स्टेटसला ठेवले होते की आज पाच लोकांचा मृत्यू होईल. दरम्यान, हे हत्याकांड होत असताना जवळच मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या राम मनोहर यादव यांना गोळीबाराचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना सुनील यांचं संपूर्ण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आढळलं आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. सुनील आणि त्याची पत्नी अंगणातील नळाजवळ मृतावस्थेत पडले होते. तर त्यांच्या दोन्ही मुली तिथेच १० फूट अंतरावर पडल्या होत्या.

शिक्षक होण्यापूर्वी सुनीलने युपी पोलिसांत काम केले होते. १२ मार्च २०२१ पासून ते अमेठीतील पन्हौना प्राथमिक शाळेत शिकवत होते. सुनीलचे वडील राम गोपाल यांच्या तक्रारीवरून चंदनविरोधात खुनाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. सुनील कुमार यांचे वडील राम गोपाल कुमार यांनी संताप व्यक्त करत म्हटले कि, “ज्या पद्धतीने माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे, त्याचप्रमाणे आरोपीचा मृत्यू झाला पाहिजे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

10 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago