क्राईम

धक्कादायक! 22 वर्षीय तरुणीवर स्पा मालक आणि ग्राहकाकडून सामूहिक बलात्कार

दिल्ली : एका 22 वर्षीय तरुणीवर स्पा मालक आणि एका ग्राहकाने सामूहिक बलात्कार केला. दिल्लीतील पीतमपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. रिपोर्ट्सनुसार, ती पीतमपुरा येथील ओशन स्पामध्ये एक कर्मचारी होती. तिला सांगण्यात आले होते की तिला फक्त मुलींना मसाज करण्याचे काम करायचे आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी शनिवारी ट्विटरवर या घटनेची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पीतमपुरा येथील ओशन स्पामध्ये काम करत होती. ती इथे मुलींना मसाज करण्याचे काम करायची. दरम्यान, ओशन स्पाचा मालक आणि एका ग्राहकाने आधी पीडित महिलेला जबरदस्तीने दारू पाजली आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.त्यानंतर आरोपींनी पैशाचे आमिष दाखवून तिला गप्प राहण्यास सांगितले.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी शनिवारी ट्विटरवर या घटनेची माहिती दिली. देशाच्या राजधानीत खुलेआम वेश्याव्यवसाय किंवा सेक्स रॅकेट चालवले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago