क्राईम

धक्कादायक! अल्पवयीन मुलीने आईला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत बघितले, मग…

बिहार : बिहारमधील भागलपूर क्षेत्रातील कृपरामडीह शाहूनगर टोला येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी महत्त्वाचा खुलासा झाला आहे. अल्पवयीन मुलीची झोपेत निर्घृण हत्या करण्यात आली होती, दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा प्रेमप्रकरणाशी संबंध जोडून तपास करत होते. पोलीस तपासात खुनाची तार ऑनर किलिंगशी जोडलेली दिसत होती. मात्र आता पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागला असून, त्यामुळे या हत्येचे गूढ उकलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलीच्या आईचे अनेक जणांशी अनैतिक संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच या महिलेचे गावातच राहणाऱ्या तिच्या दिराशी देखील अनैतिक संबंध होते. खुनाच्या सुमारे १५-२० दिवस आधी मयत अल्पवयीन मुलीने आपल्या आईला या व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. तेव्हापासून मुलीची आई आणि तिचा प्रियकर हे रहस्य उघड होईल म्हणून घाबरत होते.

दरम्यान, त्या घटनेनंतर तिच्या आईने प्रियकरासह मिळून कट रचला आणि अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या आपल्या मुलीला संपवण्याचे ठरवले. ही घटना घडवून आणण्यासाठी आणखी दोघांची मदत घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. घटनेच्या वेळी मुलीची आई आपल्या मुलीला घरात एकटी सोडून बाजारात निघून गेली. यादरम्यान दीड वाजण्याच्या सुमारास गुन्हेगारांनी या अल्पवयीन मुलीचा खून केला.

पोलीस या मुलीच्या खुनाचा तपास करत होते, यावेळी पोलिसांना नवीन नवीन माहिती मिळत गेली आणि पोलिसांना या कटाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस या मुलीची आई आणि तिच्या प्रियकराची कसून चौकशी करत आहेत. लवकरच तपास पूर्ण करून या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago