A minor girl kidnapped and raped
मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी शुक्रवारी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नवी मुंबईतील कळंबोली परिसरात नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) 376, 323 आणि 506 आणि POSCO कायद्यांर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 5 सप्टेंबर रोजी कॉलेजला जाण्यासाठी तिच्या घरून निघाली होती, मात्र ती वडाळ्यात आली असता आरोपी बोलेरो कार घेऊन आला आणि या मुलीला जबरदस्तीने गाडीत नेले. तिला पुणे एक्स्प्रेस वेवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सुरुवातीला कळंबोली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर हा विषय पुढील तपासासाठी माटुंगा पोलिस ठाण्यात पाठवण्यात आला. तरुणीची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पुढील तपास सुरू केला आणि संशयितावर गुन्हा दाखल करून घेतला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…