ग्लोबल

VIDEO : चीनमध्ये 650 फूट उंचीच्या गगनचुंबी इमारतीला भीषण आग, संपूर्ण इमारत जळून खाक

चीन : मध्य चीनच्या चांग्शा शहरात शुक्रवारी एका गगनचुंबी इमारतीला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्य प्रसारक CCTV नुसार, सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमचे कार्यालय असलेल्या 42 मजल्यांच्या इमारतीत ही आग लागली. दरम्यान, घटनास्थळावरून धुराचे प्रचंड लोट निघत होते आणि आगीने भीषण स्वरूप धारण केले होते.

सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉम बिल्डिंग – जी 200 मीटर पेक्षा जास्त उंच आहे, ती या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. शहराच्या मध्यभागी घटनास्थळी 36 अग्निशमन ट्रक आणि 280 अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले आहे आणि घटनास्थळी बचावकार्य सुरू केले.

थरारक व्हिडिओमध्ये काळ्या धुराचे लोट आकाशात पसरत असताना इमारतीमधून केशरी ज्वाला उसळताना दिसत आहेत. इमारतीमधील सर्व कामगार वेळीच या भीषण आगीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. हुनान प्रांताची राजधानी चांग्शा हे सुमारे 10 दशलक्ष लोकसंख्येसह राज्यातील सर्वात मोठे शहर आहे.

चायना टेलिकॉमने सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, “आज दुपारी साडेचार वाजेपर्यंत, चांगशा येथील आमच्या नंबर 2 कम्युनिकेशन टॉवरला लागलेली आग विझवण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी अद्याप आढळली नाही.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago