क्राईम

भयंकर! अल्पवयीन मुलीने 7 वर्षांच्या चिमुकलीचा तलवारीने गळा कापला, आणि…

जयपूर : एका सात वर्षांच्या मुलीचा तिच्याच १६ वर्षीय आत्याने शिरच्छेद केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यातील झिंझवा फाला गावात ही भयंकर घटना घडली. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.

अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबियांनी असा दावा केला की ती मागील दोन दिवसांपासून विचित्रपणे वागत होती. ती हातात तलवार घट्ट धरून पूजा करत होती. जेव्हा तिचे वडील आणि काकांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्यांच्यावर हल्ला केला, तिने कुटुंबाला घाबरवले.

दरम्यान, या अल्पवयीन आरोपीने तिच्या खोलीत झोपलेल्या 7 वर्षांच्या भाचीला प्रथम ओढून नेले आणि नंतर तलवारीने तिचा गळा कापला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला कसेबसे पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर एसएचओ गोविंद सिंह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांना घराबाहेर 7 वर्षांच्या मुलीचा मृतदेह पडलेला दिसला. पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी सुरू आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर मुलीला अटक करण्यात आली आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बांसवाडा येथून एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago