क्राईम

धक्कादायक! 24 वर्षीय महिलेवर 15 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून हॉटेलच्या महिला प्रसाधनगृहात बलात्कार

देहराडून : देहराडूनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर हॉटेलमध्ये १५ वर्षीय मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना १७ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार पंचतारांकित हॉटेलच्या महिला प्रसाधनगृहात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पश्चिम बंगालची आहे. ती विवाहित असून तिला एक मुलगी आहे. ही महिला शुक्रवारी (१७ जून) प्रसाधनगृहात मोबाईल चार्ज करत होती, यावेळी आरोपी लेडीज वॉशरूममध्ये घुसला आणि तिच्याशी बोलू लागला. यावेळी महिलेने आरोपीला महिलांच्या शौचालयातून बाहेर पडण्यास सांगितले. मात्र, आरोपीने प्रतिकाराला न जुमानता वॉशरूमचा दरवाजा आतून बंद करून तिच्यावर बलात्कार केला. तक्रारदार महिलेने सांगितले की, “मी मदतीसाठी आरडाओरडा केला, पण दरवाजा बंद असल्याने माझा आवाज कोणीही ऐकला नाही.”

महिलेने राजपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर, छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलाच्या वडिलांनी हे प्रकरण शांत करण्यासाठी तिला पैशांची ऑफर दिली पण तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. महिलेच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याची पुष्टी झाल्याचे एसएचओ यांनी सांगितले.

राजपूर पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) मोहन सिंग यांनी सांगितले की त्यांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 376 (बलात्काराची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अल्पवयीन आरोपी हा गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या कुटुंबीयांसह हॉटेलमध्ये थांबला होता आणि दुपारच्या सुमारास चेकआऊटसाठी जात होता. अटकेनंतर, अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याची रवानगी शनिवारी हरिद्वारमधील बालगृहात करण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago