क्राईम

भयंकर! 15 वर्षांच्या मुलीने 37 वर्षीय प्रियकरासह केली आई-वडिलांची हत्या

झारखंड : झारखंडमधील हेमंत सरकार गुन्हेगारी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यातच पोलिसांनी मंगळवारी जमशेदपूर येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला. पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील जमशेदपूर येथे रविवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी मंगळवारी छडा लावला. एका 15 वर्षांच्या मुलीने तिच्या 37 वर्षीय प्रियकरासह तिच्या आई-वडिलांना हातोडा आणि प्रेशर कुकरने मारहाण करून ठार केल्याचे पोलिसांनी उघड केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एल्को पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅनिफिट येथील जोडप्याचे मृतदेह त्यांच्याच घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर त्यांची 15 वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर संशयाच्या आधारे शोधाशोध केली असता या तरुणीला त्याच्या प्रियकरासोबत ताब्यात घेण्यात आलं. त्यांना मंगळवारी सकाळी बिरसानगर येथील ओमनगरमध्ये राहणारा तिचा प्रियकर सलितकुमार याच्यासोबत त्याच्या भाड्याच्या घरातून पकडण्यात आले.

पोलिस अधीक्षक (शहर) के विजय शंकर यांनी 24 तासांपेक्षा कमी कालावधीत या प्रकरणाची उकल केल्याचा दावा केला आणि सांगितले की मुलगी रविवारी रात्री तिच्या प्रियकरासह घरातून पळून जाऊन लग्न करणार होती, परंतु तिचे पालक जागे झाले. त्यानंतर आई-वडिलांनी तिला बाहेर जाण्यापासून थांबवले असता दोघांनी हातोड्याने व प्रेशर कुकरने त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणी प्रियकरासह स्कूटरवरून पळून गेली. एसएसपी प्रभात कुमार यांनी मंगळवारी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले कि, गुन्हेगाराला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तसेच, अल्पवयीन मुलीला रिमांड होममध्ये पाठवले जाईल. गुन्हेगारांच्या सांगण्यावरून एक हातोडा, रक्ताने माखलेला प्रेशर कुकर आणि स्कूटर जप्त करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago