7 boys gang raped 10 year old girl in gurugram six accused are minors
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला आठ महिन्यांहून अधिक काळ वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. मंगळवारी, 19 एप्रिल रोजी पोलिसांनी तिची गुंटूर येथून सुटका केली. आठ महिन्यांत तिच्यावर 80 हून अधिक पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी मंगळवारी बीटेकच्या एका विद्यार्थ्यासह 10 जणांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 80 जणांना अटक करण्याची प्रक्रियाही पोलिसांकडून सुरू आहे. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला सवर्णा कुमारी या महिलेने दत्तक घेतले होते, तिने जून 2021 मध्ये कोरोना महामारीच्या काळात पीडितेच्या आईशी हॉस्पिटलमध्ये मैत्री केली होती. त्यानंतर मुलीच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर सवर्णा कुमारी मुलीला घेऊन तिच्या घरी गेली. मात्र, तिने ही बाब मुलीच्या वडिलांपासून लपवली. ऑगस्ट 2021 मध्ये मुलीच्या वडिलांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी मुख्य आरोपी महिला सवर्णा कुमारीची ओळख पटवली. या प्रकरणातील पहिली अटक जानेवारीमध्ये झाली होती. मंगळवार, 19 एप्रिल रोजी गुंटूर पश्चिम विभागातील पोलिसांनी बीटेकच्या विद्यार्थ्यासह आणखी 10 जणांना अटक केली. त्यानंतर आरोपी आणि पीडितेची चौकशी केल्यावर यातील वेदनादायक आणि धक्कादायक सत्य पोलिसांसमोर समोर आले.
गेल्या आठ महिन्यांपासून या 13 वर्षीय मुलीला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील वेगवेगळ्या ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी पाठवले जात होते. त्याआधारे पोलिसांनी मुलीला घेऊन जाणाऱ्या महिलेची मुख्य आरोपी म्हणून ओळख पटवली, जिने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायामध्ये ढकलले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक के सुप्रजा यांनी सांगितले की, पोलिसांनी 80 आरोपींना ओळखले असून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी काही किंगपिन आहेत, 35 दलाल आहेत आणि बाकीचे ग्राहक आहेत. मुलीच्या वयाचा आणि स्थितीचा फायदा घेत अनेक टोळ्यांनी मुलीला विकत घेतले आणि तिला दोन्ही राज्यात अनेक ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
आणखी काही फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणातील एक आरोपी लंडनमध्येही आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींकडून एक कार, 53 मोबाईल, तीन ऑटो आणि बाईक जप्त केल्या आहेत. आरोपींना विजयवाडा, हैदराबाद, काकीनाडा आणि नेल्लोर येथून अटक करण्यात आली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…