कोरोना

जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता; जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक

पुणे: माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. असा सवाल रागिणी गमरे त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. माझी मुलगी प्रिया गायकवाड चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रिया गायकवाड  ही महिला बरी झाल्यानंतर तिची आई सदर महिलेला घरी घेऊन जाण्यासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये आली असता, आईला तुमची मुलगी येथे अडमिटच नव्हती, अशी धक्कादायक माहिती देण्यात आल्यानंतर आईला मात्र मोठा धक्काच बसला. दरम्यान जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या आपल्या पोटच्या गोळ्यासाठी आता या माऊलीने उपोषणचा मार्ग निवडला आहे.

दरम्यान या सदर प्रकरणाची चौकशी उपायुक्त दर्जाचे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालण्याची गरज आहे. संस्थात्मक रचनेतून गेलेल्या महिलेचा २० दिवस तपास लागू शकत नाही हे दुर्दैवी आहे, अशी टीका स्थानिक प्रशासन आणि सरकारवर केली जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago