महाराष्ट्र

पंकजा मुंडे- धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी

बीड:  धनंजय मुंडे यांनी आपण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळवून दिल्याचा दावा केला आहे तर  पंकजा मुंडे यांच्याकडून स्वतः प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मिळाल्यानंतर श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आहे. यावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा समोरा-समोर आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे बहीण-भावा मधील वाद काही काळ थांबला होता. मात्र, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या थकहमी वरून पुन्हा एकदा हा संघर्ष पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री, सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे. यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं राज्यातील ३२ साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभारही मानले आहेत.

साखर कारखान्याच्या विषयात राजकारण आणणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवले. शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केल्याचा दावा करत आता तरी शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे देऊन ‘वैद्यनाथ’सांभाळावा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. पुढे बोलताना मुंडे म्हणाले कि पंकजा मुंडेनी पाठपुरवठा इथे बसून केला कि परदेशातून केला हे माहित नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे या दोघांनी कष्टाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा करून कारखान्याला आघाडीवर नेले होते. मात्र, पंकजा मुंडे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर ५ वर्षांतच कर्मचाऱ्यांवर थकीत पगारासाठी उपोषणाची वेळ आली, हे दुर्दैव आहे. आता तरी गळीत हंगाम सुरू करून परिसरातील ऊसाचे गाळप करावे, असं देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago