When will the second wave of corona subside? Find out the opinion of medical experts
पुणे : कोरोनाची दुसरी लाट केव्हा ओसरणार? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये सातत्याने येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी १५ दिवस ते एक महिन्यामध्ये ही लाट उतरणीला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, त्यासाठी सर्वसामान्यांनी सर्व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करायला हवे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
राज्याच्या मृत्युदर समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी आतापर्यंत आलेल्या कोरोना संसर्गाच्या लाटा या दोन महिन्यांच्या कालावधीने ओसरायला लागल्याचे असे सांगितले. संसर्गाचा जोर उतरणीला लागण्याचा हा प्रकार सगळीकडे थोड्याबहुत फरकाने दिसून आला आहे. जितक्या वेगाने ही लाट वर गेली आहे. तितक्याच वेगाने ती खाली येणे अपेक्षित आहे. यापूर्वीच्या लाटा थोड्या धीम्या प्रकारे खाली आल्या होत्या. मात्र आता या संसर्गाच्या लाटेमध्ये असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता हा संसर्ग लवकरच उतरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्याची लाट हळूहळू खाली येण्याच्या वैद्यकीय विश्लेषणामध्ये मागील लाटेमध्ये ६० टक्के व्यक्तींना करोना संसर्गाची लागण वा किमान संपर्क तरी झाला आहे. त्यामुळे या लाटेमध्ये उरलेल्या व्यक्तींमध्ये संसर्गाची लागण गृहीत धरली, तर समूह प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी मदत होईल, असाही वैद्यकीय अंदाज व्यक्त होत आहे.
टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सव्वा ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये रुग्णसंख्येचा आलेख खाली उतरायला लागेल, असे सांगितले. येत्या १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख निमुळता होऊन हळूहळू संसर्गाची उतरंड सुरू होईल. मात्र, या कालावधीमध्ये संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गर्दी न करणे, लसीकरणाचा वेग वाढवणे, मास्कचा वापर करणेही गरजेचे आहे, यावरही डॉ. जोशी यांनी भर दिला. काही वैद्यकीय संशोधनामध्ये डिसेंबरच्या अखेरीस देशातील २१.५ टक्के लोकसंख्येमध्ये अॅण्टीबॉडी विकसित झाल्याचे म्हटले आहे. एप्रिलच्या अखेरीस यामध्ये सात टक्के लोकसंख्येची भर पडण्याची शक्यता आहे. तर लसीकरणाच्या माध्यमातून १२ टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. लसीकरणाचा दुसरा डोस झाल्यानंतर किती टक्के व्यक्तींमध्ये संसर्गाची पुन्हा लागण होते याचाही अभ्यास करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…