Popular news anchor Rohit Sardana passes away
आज तकचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. त्यांच्यावर दिल्लीत करोनावर उपचार सुरू होते. पण याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. टीव्ही जगतात रोहित सरदाना हे एक मोठं नाव होतं.
रोहित सरदाना यांनी झी न्यूजसोबत प्राईम टाईम अँकर म्हणून काम केलं. त्यानंतर ते झी न्यूजमधून आज तकमध्ये आले होते. आज तकवर त्यांचा दंगल हा कार्यक्रम लोकप्रिय होता. मितभाषी आणि संयमी न्यूज अँकर म्हणून ते परिचीत होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करुन ही धक्कादायक माहिती दिली. सुधीर चौधरी यांनी ट्विट करत म्हटलं कि, “आताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून हात थरथर कापू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदानाच्या मृत्यूची ती बातमी होती. हा व्हायरस आमच्या इतक्या जवळच्या कोणाला घेऊन जाईल याची अजिबात कल्पना नव्हती. हा देवाचा अन्याय आहे, ओम शांती”
रोहित सरदाना हे अनेक वर्षांपासून टीव्ही मीडियात कार्यरत होते. ‘आज तक’ वाहिनीवरील दंगल या शोचं ते अँकरिंग करत होते. त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…