centre prohibits exports of injection remdesivir till the covid situation in the country improves
रायगड : कोरोनाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, रायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर या इंजेक्शनच्या 500 कुप्या पुरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर साधारण 120 कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन वापरण्यात आले होते. यापैकी 90 रुग्णांना या इंजेक्शनमुळे दुष्परिणाम जाणवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सगळ्यांमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसून आली. इतक्या मोठ्याप्रमाणावर रुग्णांना दुष्परिणाम जाणवल्याने आता अन्न आणि औषध प्रशासनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…