जुलैमध्ये निर्यात बंदी उठवल्यानंतर भारताने अमेरिकेसह अन्य पाच देशांना २३ लाख पीपीई किटचा पुरवठा केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. करोनाच्या सुरुवातीस भारतात पीपीई किटचा प्रचंड तुटवडा होता. पीपीई किट्स, एन-९५ मास्क यासारखी बहुतेक साधनं ही भारतात तयार होत नव्हती. त्यामुळे भारताला त्याची आयात करावी लागत होती. सुरूवातीच्या काळात वैद्यकीय उपकरणांसाठी भारताला दुसऱ्या देशांवर निर्भर राहावं लागलं. मात्र, त्यानंतर भारतानं आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
करोनासंबंधित वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीच्या दिशेनं भारत वाटचाल करत आहे. जागतिक बाजारपेठेत पीपीई कीटच्या निर्यातीमुळे भारताला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
याच काळात केंद्र सरकारने राज्य सरकार तसेत केंद्रशासित प्रदेशात देखील पीपीई किट, एन-९५ मास्कचा मोफत पुरवठा केला आहे. मार्च ते ऑगस्ट २०२० च्या कालावधीत केंद्र सरकारनं स्वतःच्या बजेटमधून १.४० कोटी पीपीई किटची निर्मिती केली. याच काळात राज्यांना १.२८ कोटी पीपीई किट मोफत पुरवल्या.
आरोग्य, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, संरक्षण संशोधन व विकास संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांनी भारताने स्वतःची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…