काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत ठाकरे सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
“राज्यातील जिम सुरु करावी अशी अनेक दिवसांची मागणी होतीच. गेल्या चार महिन्यात जिम व्यवसाय अडचणीत होता. आरोग्याच्या दृष्टीनेही अनेकांच्या समस्या आहेत. म्हणून सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांमध्ये या राज्यातील सर्व चालकांना नियमावलीचं पालन करत जिम सुरु करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “परवा माझ्याकडे प्रस्ताव आला असता सही करुन फाईल पुढे पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांची दोन दिवसांत स्वाक्षरी झाली की राज्यात जिम सुरु करण्याची परवानगी दिली जाईल”.
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या मागणीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राज ठाकरेंची मागणीसुद्धा रास्त आहे. ती मागणी योग्य होती. फडणवीस, राज ठाकरे यांनी मागणी केली असली तरी सरकारने सर्व बाजूंचा विचार करुनच निर्णय घेतला आहे. दोन दिवसात यासंबंधी आदेश निघेल”.
केंद्र सरकारने लॉकडाउनचे निर्बंध शिथील करताना जिम सुरु करण्यास परवानगी दिली होती मात्र राज्य सरकारने त्यासाठी नकार दिला होता. यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असून जिम सुरु कऱण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी होत होती.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…