कोरोना

कोरोनाला कसं हरवायचं? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कडून पंतप्रधान मोदीं यांना पत्र… दिले ‘हे’ सल्ले

दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना 5 सल्ले दिले आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या पत्रात म्हटले कि, पुढील सहा महिन्यात राज्यांना कशापद्धतीने लस पुरवठा होईल याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे. सरकारला सांगावं लागेल की, वेगवेगळ्या लस उत्पादक कंपन्यांना किती ऑर्डर देण्यात आली आहे. शिवाय अधिक लोकांना लस द्यायची असेल तर त्यासाठी अडवान्समध्ये ऑर्डर द्यायला हवी जेणेकरुन ऑर्डर वेळेत मिळेल. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पुन्हा जनजीवन कसं सुरळित होईल असं लोकांना वाटू लागलं आहे. महामारीवर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पण लोकांचे लसीकरण होणे सर्वात महत्त्वाचे आहे. असंही ते म्हणाले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले 5 सल्ले :

  1. कोरोना काळात सरकार किती लशी कंपन्यांकडून घेत आहेत. ते सार्वजनिक करावे. कोणत्या कंपनीकडून किती लस घेण्यात आल्या तसेच कोणत्या कंपनीला किती लशींची ऑर्डर दिली हे लोकांना माहिती असावं.
  2. कोणत्या राज्याला किती लशी मिळाळ्यात याबाबत एक पारदर्शक फॉर्म्युला असावा.
  3. 45 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या फ्रंट लाईन वर्कर्संनाही लस देण्यात यावी. यासाठी वयाची मर्यादा असू नये. शिक्षण, चालक, पंचायत कर्मचारी, वकील या सर्वांना लस देण्यात यावी.
  4. लस निर्मात्या कंपन्यांना उत्पादनासाठी मदत व्हावी यासाठी पंतप्रधानांनी फंड द्यावे, तसेच इतर सवलती द्याव्यात.
  5. कोरोना लस निर्मितीसाठी लागणारे लायसन्स काही काळासाठी स्थगित करावे, जेणेकरुन अन्य कंपन्याही लशीची निर्मिती करु शकतील.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago