China refuses to disclose early cases of corona infection to WHO
नवी दिल्ली : कोरोनाचा प्राणघातक डेल्टा व्हॅरिएंट आतापर्यंत सुमारे 85 देशांमध्ये आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी हा आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य प्रकार असल्याचे सांगितले आहे. चिंतेची बाब म्हणजे डेल्टा व्हॅरिएंट लसीकरण झालेल्यांना देखील वेगाने संक्रमित करत आहे. त्यामुळे WHO च्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे.
जिनेव्हा येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत टेड्रोस अधानोम म्हणाले की, ‘डेल्टा हा एक अत्यंत संसर्गजन्य प्रकार आहे ज्याने सुमारे 85 देशांना वेढले आहे. एवढेच नाही तर हा व्हॅरिएंट लस घेतलेल्या लोकांना देखील वेगाने संक्रमित करत आहे. डब्ल्यूएचओने इशारा दिला आहे की जेव्हा आपण कोरोनाचे निर्बंध शिथिल करतो, आणि सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक अंतर पाळणे या गोष्टीकडे लक्ष देणं कमी करतो, तेव्हा जगभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागतात. ते पुढे म्हणाले की संसर्गाची गती वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रकार वाढू लागतात. आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडतो. या कारणांमुळे देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढते.
नवीन कोरोना व्हॅरिएंट तयार होण्याची शक्यता जास्त आहे आणि ते सतत नोंदवले जात आहेत. व्हायरसच्या बाबतीत हे होत असतं. ते स्वतःच विकसित होत राहतात. परंतु आपण यावर ब्रेक लावून व्हेरिएंट विकसित करण्याची प्रक्रिया थांबवू शकतो.
डेल्टा हा कोरोनाचा एक अतिशय धोकादायक प्रकार आहे आणि अल्फा प्रकारापेक्षा हा जास्त संसर्गजन्य आहे, जो युरोपसह जगातील बर्याच देशांमध्ये पसरला होता. त्याची प्रकरणे जगभरात झपाट्याने समोर येत आहेत.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डेल्टा व्हॅरिएंटमुळे संक्रमित झालेल्या कोरोना रूग्णांमध्ये ऐकायला येणे कमी होणे, ओटीपोटाचा त्रास, रक्ताच्या गुठळ्या होणे, गॅंग्रिन या सारखी लक्षणे दिसून येत आहेत. आत्तापर्यंत ही लक्षणे कोरोना रूग्णांमध्ये सामान्यत: दिसली नव्हती.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…