Maharashtra on the threshold of the third wave of the Corona
कोरोनाचं थैमान सुरु असून दररोज सरासरी 40 ते 50 हजारांदरम्यान नवे रूग्ण वाढत आहेत. मात्र आता ही सरासरी वाढलेली दिसून येत आहे. मृत्यूंचं प्रमाण देखील वाढलं आहे. काल दिवसभरात 52 हजार 123 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 15 लाख 83 हजार 792 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 775 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.
देशात सध्या 5 लाख 28 हजार 242 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 10 लाख 20 हजार 582 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63 टक्क्यांच्या वरती गेला आहे.
दुसरीकडे देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा कहर आहे. राज्यात कालच्या दिवसभरात कोरोनाच्या 9 हजार 211 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख 46 हजार 129 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…