Categories: शेती

शेतकऱ्यांना आणि शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे- कृषीमंत्री दादाजी भुसे

‘विकेल ते पिकेल’ ही मुख्यमंत्र्यांची कन्सेप्ट आहे. आयटी क्षेत्राचा वापर करुन प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. शेतीचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना, शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेती संबंधित अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.

गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बियाण्यांच्या तक्रारी आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. याविषयी दादाजी भुसे म्हणाले की, सोयबीनच्या बियाण्यांबद्दल तक्रारी आल्या. 75-80 टक्के छाननी पूर्ण झाली असून ज्या कंपन्या दोषी आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. महाबीज हे कृषी विभागाचंच महामंडळ आहे. बियाण्यांमध्ये दोष असेल तर रिप्लेस करुन देण्याची सूचना दिली होती. शिवाय रक्कमही देण्यास सांगितलं होतं.

कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याच तालुक्यात युरियाचा तुटवडा असल्याचा आरोप होत आहे. यावर दादाजी भुसे म्हणाले की, कृषीमंत्र्यांचा तालुका असल्याने मागच्या वर्षीपेक्षा सव्वा दीड पटीने जास्त युरिया मालेगावला उपलब्ध करुन दिलेला आहे. मात्र आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी येतात, त्यांनाही युरिया द्यावा लागतो. पण कोणालाही युरियाची कमतरता पडू देणार नाही. एकाच वेळी मागणी वाढल्याने काही वेळा कमी पडला असेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच 266 रुपयात युरियात मिळत आहे.”

महाराष्ट्राची कर्जमाफीची योजना ही कमी कालावधीत सर्वात जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी आहे. येत्या काळात वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभं करणार असल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. भारतातील कमी कालावधीत सर्वात जास्त शेतकऱ्यांना लाभ देणारी ही महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना आहे. मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरमध्ये या योजनेची घोषणा केली. जानेवारी ते 15 मार्चपर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी करण्यात आली आणि 15 मार्चनंतर त्याची अंमलबजावणी झाली. 30 ते 32 लाख शेतकरी पात्र ठरतात. त्यामधील 19 लाख शेतकऱ्यांना मार्चमध्ये 12 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले,” असं दादाजी भुसे यांनी सांगितलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago