Mother elephant faints after baby falls into manhole, Rescue team performs CPR to revive her in viral video
थायलंड : थायलंडमध्ये एक विलक्षण घटना समोर आली आहे. एका आई हत्तीणीचे बाळ एका मॅनहोलमध्ये पडले होते मदतीसाठी मोठ्याने ओरडत होते. या सर्व तणावामुळे आई हत्तीणी बेशुद्ध झाली, त्यानंतर पशुवैद्यकीय आणि राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांनी तिला सीपीआर दिला. वास्तविक, तिचे बाळ एका मॅनहोलमध्ये पडले होते आणि कर्मचारी या पिल्लाला वाचवण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याची आई उन्मादात खाली कोसळली. या घटनेचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे.
सीबीएस न्यूजनुसार, थायलंडच्या नाखोन नायोक प्रांतात बुधवारी ही घटना घडली. एक हत्तीचे बाळ एका नाल्यात घसरले होते आणि मोठ्याने ओरडत होते. त्याच्या आईने तिची बाजू सोडली नाही, तेवढ्यात एका वाटसरूने हे सर्व बघितले आणि अधिकाऱ्यांना माहिती दिली. नॅशनल पार्कच्या कर्मचार्यांना हत्तीणीला भूल द्यावी लागली कारण ती खूप तणावाखाली होती. मात्र, शॉट्समुळे ती खड्ड्यात अर्धवट अडकली.
रेस्क्यू टीमला क्रेनच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यात यश आले, मात्र तणावामुळे ती बेशुद्ध झाली होती. त्यामुळे तिला बरे करण्यासाठी बचावकर्त्यांना सीपीआर द्यावा लागली. दरम्यान, तिच्या 1 वर्षाच्या बछड्याला मॅनहोलमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर आई हत्तीणी लवकरच शुद्धीत आली. त्यानंतर आई हत्तीणी आणि तिचे पिल्लू सुरक्षितपणे जंगलात परतले.
दरम्यान, व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी बचाव पथकाने केलेल्या जलद कारवाईचे कौतुक केले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…