तंत्रज्ञान

व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘या’ फीचरने युजर्सना फोनमध्ये चॅट तसेच मीडिया फाइल्स यांचं स्टोरेज मॅनेज करणं होणार सोपं.. जाणून घेऊयात

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सच्या सोयीसाठी नवीन अपडेट जाहीर केले आहे. ह्या अपडेट फिचरला स्टोअर मॅनेजमेंट टूल (storage management tool) म्हणून ओळखले जाईल, जे कंपनीने रिडिझाइन केले आहे. त्याचबरोबर, व्हॉट्स अॅपवरील हे नवीन स्टोअर मॅनेजमेंट टूल या आठवड्यात जगभरात आणले जाईल.

स्टोरेज मॅनेजमेंट टूल रोलआउट झाल्यानंतर युजर्सना फोनमध्ये चॅट तसेच मीडिया फाइल्स यांचं स्टोरेज मॅनेज करणं सोपं होईल. सरळ शब्दात सांगायचे म्हणजे, युजर्सना अधिक जागा व्यापणारे कन्टेन्ट ओळखण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त, हे मेसेज आणि मीडिया फाइल्स जास्त प्रमाणात सिलेक्ट करून delete करता येतील.

कंपनीकडून इझी क्लीनअप सूचनादेखील दिल्या जातील. म्हणजे बर्‍याच वेळा फॉरवर्ड केल्या गेलेल्या मोठ्या फायली आणि मीडिया सामग्रीबद्दल युजर्सना माहिती उपलब्ध करुन दिली जाईल. या व्यतिरिक्त फोनमध्ये कमी आकारापासून तर जास्त आकारापर्यंतच्या फायली एका आकारात प्लेस केल्या जातील, ज्यामुळे या फायली शोधणे सुलभ होईल.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन टूलच्या रोलआउटनंतर वापरकर्त्यांना सेटिंग्स ऑप्शनवर जावे लागेल, तिथे स्टोरेज आणि डेटा ऑप्शन दिसेल आणि त्यानंतर आपण स्टोरेज मॅनेजमेंट ऑप्शनमध्ये जाऊ शकाल. व्हॉट्स अॅपच्या नवीन अपडेट्सनंतर युजर्स एक किंवा अनेक पर्याय निवडून कोणतीही फाईल डिलीट करतील, त्याआधी वापरकर्त्यांना प्री-व्ह्यू ऑप्शन पाहण्याचा पर्याय मिळेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

7 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago