तंत्रज्ञान

Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

विवोने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Vivo V20 Pro 5G आज भारतात लॉन्च केला आहे. या फोनची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत लॉन्च केले आहे. या फोनचा सेल आजपासून सुरू झाला आहे. फोनमध्ये ड्यूल सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हा फोन याआधी थायलंड मध्ये लॉन्च करण्यात आला होता.

Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्स :

  1. या फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे.
  2. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 765G SoC प्रोसेसर दिला आहे.
  3. हा स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड Funtouch OS 11 वर काम करतो.
  4. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक २ मेगापिक्सलचा मोनोक्रॉम सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात ४४ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे.
  5. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन ३३ वॉटच्या फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसोबत येतो.
  6. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय, जीपीएस, यूएसबी टाइप-C पोर्ट यासारखे ऑप्शन दिले आहेत.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago