Paytm reappears on Google Play Store
मुंबई : Google Play Store वर Paytm पुन्हा डाऊनलोड करु शकता. कंपनीनं स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करत लोकांचे आभार मानले आहेत.
गूगल प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवण्यात आलं होतं. पॉलिसी उल्लंघनाचे कारण देत गुगलने प्ले स्टोअरवरून पेटीएम App हटवलं आहे. स्पोर्ट्स सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्या अॅप्सना परवानगी देत नाही आणि असे App गुगल प्ले स्टोअर वरून काढले जातील, असं गूगलने म्हटलं होतं.
गूगलच्या निर्णयानंतर पेटीएमने ट्वीट केलं होतं की, “गुगलच्या प्ले स्टोअरवर Paytm Android App नवीन डाऊनलोड्स किंवा अपडेटसाठी तात्पुरते उपलब्ध नाही. लवकरच ते पुन्हा उपलब्ध केले जाईल. आपले सर्व पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आपण नेहमीप्रमाणे पेटीएम अॅप सुरू ठेऊ शकता.
गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “आम्ही ऑनलाईन कसिनोला परवानगी देत नाही किंवा क्रीडा सट्टेबाजीला सुलभ करू शकणार्या कोणत्याही अनियमित अॅपला मान्यता देत नाही. यामध्ये ते App समाविष्ट आहेत जे ग्राहकांना बाह्य वेबसाईटला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करतात. जे पैसे घेऊन खेळात पैसे किंवा रोख बक्षिसे मिळविण्याची संधी देतात, हे आमच्या धोरणांचे उल्लंघन आहे.”
Google Play Store वर Paytm पुन्हा डाऊनलोड करु शकता
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…