तंत्रज्ञान

नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची झाली एन्ट्री, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची बाजारात एन्ट्री झाला आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आज Nokia PureBook X14 लॅपटॉप लॉन्च करण्याची घोषणा केली. या लॅपटॉपची किंमत 59,990 रुपये आहे. Nokia PureBook X14 लॅपटॉप चे प्री-बुकिंग 18 डिसेंबरपासून सुरू होईल.

Nokia PureBook X14 चे स्पेसिफिकेशन्स :

  1. Nokia PureBook X14 लॅपटॉप चे वजन 1.1 किलो आहे. हा लॅपटॉप केवळ 16.8 मिमी जाडीचा आहे.
  2. या लॅपटॉपमध्ये पॉवरफुल साऊंडसाठी डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे.
  3. चांगल्या ग्राफिक्ससाठी, या लॅपटॉपमध्ये आपल्याला 1.1 Ghz टर्बो GPU सह इंटीग्रेटेड इंटेल UHD 620 ग्राफिक्स कार्ड मिळेल.
  4. हा लॅपटॉप 8 तास बॅटरी लाइफसह येतो. बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी यात 65 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे.
  5. कनेक्टिव्हिटीसाठी, या लॅपटॉपमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, यूएसबी 3.1, यूएसबी 2.0, सिंगल HDMI पोर्ट आणि एक RJ45 पोर्ट दिलेला आहे. लॅपटॉपमध्ये सिंगल ऑडिओ आउट पोर्ट आणि एक माइक पोर्ट देखील दिलेला आहे.
  6. ऍडिशनल वैशिष्ट्याबद्दल बोलायचं झालं तर यात विंडोज हॅलो फेस अनलॉकसह HD IR वेबकॅम, ऍडजस्टेबल बॅकलाइटसह कीबोर्ड आणि मल्टिपल जेश्चर ऑप्शन असणारा टचपॅड देखील मिळतो.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago