तंत्रज्ञान

मेक इन इंडिया : UBON ने लॉन्च केला 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही

UBON ने आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही लॉन्च केला आहे. नवीन 40 इंचाचा UBON स्मार्ट एलईडी टीव्ही फुल एचडी रेडी डिस्प्ले, 16: 9 स्क्रीन रेशियो आणि 24 वॅटच्या दमदार स्पीकरसह येतो. कंपनीने म्हटले आहे की हा स्मार्ट एलईडी टीव्ही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत बनविला गेला आहे.

UBON च्या 40 इंचाच्या स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज आहे. यात दोन HDMI पोर्ट आहेत. या टीव्हीमध्ये एक हेडफोन कनेक्टर आहे. हा टीव्ही अँड्रॉइड 9 टीव्ही ओएस सह आहे. कंपनीचा असा दावा आहे की स्मार्ट एलईडी टीव्हीचा स्क्रीन रीफ्रेश दर 50 हर्ट्झ आहे, जो टीव्ही पाहताना वास्तविक चित्रासारखी अनुभूती देईल. कंपनीने साउंड क्वालिटी क्रिस्टल क्लीअर असल्याचा दावाही केला आहे.

टीव्हीच्या लाँचिंगच्या प्रसंगी UBON चे व्यवस्थापकीय संचालक मंदीप अरोरा म्हणाले, ‘उत्सवाच्या हंगामापूर्वी UBON ने आपले सर्वाधिक प्रलंबीत उत्पादन म्हणजेच नवीन 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही बाजारात आणला आहे. सध्याचा काळ लक्षात घेता ग्राहकांना परवडणार्‍या किंमतीत नवीन उत्पादनांची अपेक्षा असते. लोकांना डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण हवे असते. या नवीन एलईडी टीव्हीमधील डिझाइन आणि ट्रेंडी वैशिष्ट्ये खिशालाही परवडणाऱ्या किंमतीवर उपलब्ध आहेत. ‘

नवीन स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत 18,999 रुपये आहे. हा टीव्ही देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago