तंत्रज्ञान

होंडा Amaze या कारचं स्पेशल व्हर्जन लाँच

होंडा कार्स इंडियाने सणासुदीच्या दिवसात आपल्या कॉम्पॅक्ट सेडान Amaze या कारचं स्पेशल व्हर्जन लाँच केलं आहे. या स्पेशल व्हर्जनमध्ये डिजीपॅड २.० असेल. ही एक १७.७ सेमी टचस्क्रीन प्रगत अॅडव्हान्स डिस्प्ले ऑडिओ सिस्टम आहे.

Honda Amaze च्या पेट्रोल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.2 लीटरची क्षमतेचे नॅचरल एस्पायर्ड इंजिनचा उपयोग केला आहे. दुसरीकडे डीजल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.5 लीटरच्या क्षमतेच्या इंजिनचा उपयोग केला आहे. पेट्रोल इंजिन 90hpची पावर आणि 110Nmचा टॉर्क जेनरेट करतो. याच प्रमाणे डीजल इंजिन बाबत बोलायचे तर 100hpची पावर आणि 200Nmचा टॉर्क जेनरेट करतो.

Honda Amaze मध्ये एलईडी पोजिशन लँप, फ्रंट फॉग लँप, रियर कॉम्बिनेशन लँप, एलईडी टर्न इंडिकेटर्स सह पावर-फोल्डिंग ओआरवीएम, अलॉय व्हील आणि शार्क फिन एंटिना सारखे फीचर्स आहेत. कॉम्पॅक्ट सेडानमध्ये 7 इंचचे डिजीपॅड टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हील, स्वयंचलित एसी आणि इंजन स्टार्ट / स्टॉप बटन सारख्या अनेक सुविधा मिळतात. यात नवीन सीट कव्हर्ससुद्धा असतील. या शिवाय Amaze BS-6 मध्ये पहिल्याप्रमाणे ड्यूल एयरबॅग, एबीएस, रियर पार्किंग सेंसर आणि ईबीडी उपलब्‍ध आहे.

दिल्लीच्या शोरूममध्ये त्याची किंमत ७ लाख ते ९.१० लाख रुपये आहे. या मॉडेलचे मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ७ लाख रुपये आहे. सीव्हीटी व्हेरिएंटची किंमत ७.९० लाख रुपये आहे. त्याच वेळी, डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत ८.३ लाख रुपये आहे आणि सीव्हीटी (व्हेरिएबल ट्रान्समिशन) ची किंमत ९.१० लाख रुपये आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago