तंत्रज्ञान

भारत सरकारकडून 54 मोबाइल अ‍ॅप्स बॅन, ‘या’ लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश

नवी दिल्ली : भारत सरकारने ५४ मोबाइल अ‍ॅप्सला बॅन केले आहे. या बॅन केलेल्या नवीन अ‍ॅप्समध्ये Chinese Apps चा देखील समावेश आहे. भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचे कारण देत या अ‍ॅप्सला बॅन केले आहे.  नवीन बॅन केलेल्या अ‍ॅप्समध्ये याअगोदर बॅन केलेल्या अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे. मात्र, त्यांचे क्लोन पुन्हा प्ले स्टोरवर उपलब्ध झाले होते. यानंतर आता सरकारने पुन्हा एकदा अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

रिपोर्टनुसार, इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 अंतर्गत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे अ‍ॅप्स चीनी कंपनी Tencent, Alibaba यांच्याशी संबंधित आहे. रिपोर्टनुसार, हे अ‍ॅप्स भारतीयांचा डेटा चीन सारख्या देशात असलेल्या सर्व्हरवर ट्रान्सफर करत होते. तसेच, प्ले स्टोअरवर देखील या ५४ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. जून २०२० मध्ये भारत सरकारने २०० पेक्षा अधिक चीनी अ‍ॅप्सवर निर्बंध घातले होते.

सध्या बॅन केलेल्या अ‍ॅप्समध्ये २०२० मध्ये बंदी घातलेल्या बहुतांश अ‍ॅप्सचे रीब्रँडेड व्हर्जन आहेत. आता बॅन केलेल्या ५४ चीनी अ‍ॅप्समध्ये Beauty Camera: Sweet Selfie HD, Beauty Camera – Selfie Camera, Equalizer & Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock आणि Dual Space Lite सारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. ऑनरशिप लपवण्यासाठी या अ‍ॅप्सने आपले स्वरुप बदलले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago