तंत्रज्ञान

फेसबुकने Messenger आणि Instagram साठी आणलं Vanish Mode फीचर

फेसबुकने मेसेंजर आणि इंस्टाग्रामसाठी व्हॅनीश मोड (Vanish Mode) नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर अमेरिकेत सुरू झाले असून लवकरच विविध देशांमध्ये रोलआऊट केले जाईल. नवीन फीचरद्वारे व्हॅनिश मोडमध्ये टेक्स्ट, फोटो आणि व्हॉइस मेसेज पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होतील.

यूजर्सना अॅपच्या सेटिंग्ज मेनूवर जावे लागेल, तिथून ऑप्शन एनेबल करता येणार आहे. यूजर्स आपल्या गरजेनुसार हा ऑप्शन डिसेबल देखील करु शकतील. फेसबुक मेसेंजरवर आधीपासूनच एक सीक्रेट कन्वर्सेशन फीचर देण्यात आलेलं आहे. ज्याच्या मदततीने यूजर्स एंड-टू-एंड एनक्रिप्टेड चॅट करु शकतात. यावेळी सीक्रेट चॅटवेळी ज्या काही फाईल्स असतील त्या फेसबुक सर्व्हरवर नव्हे तर यूजर्सच्या फोनमध्ये स्टोर होतील. मीडिया रिपोर्टनुसार, फेसबुकचे नवीन फीचर व्हॅनिश मोड केवळ वैयक्तिक चॅट्सवरच काम करेल. हे फीचर ग्रुप चॅटसाठी नसेल. फेसबुकने अलीकडेच आपल्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपवर एक सेल्फ डिलीटिंग फीचर लॉन्च केले आहे. या फीचरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर जेव्हा मेसेज रिसीव्हर पाहिल तेव्हा तो आपोआपच डिलीट होईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago