तंत्रज्ञान

आता घरबसल्या व्हॉट्सअपवरुन अशा पद्धतीने सिलेंडर बुक करा..

मुंबई : आजच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपने आपले कार्य अधिक सुलभ केले आहे. बँकेचे स्टेटमेन्ट किंवा अन्य गोष्टी असो, आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर सहजपणे याबद्दल माहिती मिळते. आता व्हॉट्सअ‍ॅपवर एलपीजी सिलिंडरही बुक करता येणार आहे. जेणेकरून आपण घरी बसून काही मिनिटांतच सिलिंडर ऑर्डर करू शकाल. इंडेन आणि एचपी गॅस हे दोन्ही व्हॉट्सअ‍ॅपवरुन सिलिंडर बुक करण्याची सुविधा देतात. यामुळे तुम्ही अगदी सहज एलपीजी सिलिंडरचा दिलेला नंबर सेव्ह करुन एलपीजी सिलेंडर बुक करू शकता.

इंडेन युजर्सना या नंबरवर करावे लागेल व्हॉट्सअप
आपण इंडेनचे ग्राहक असाल तर आपण 7718955555 वर कॉल करून आपले सिलिंडर बुक करू शकता. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवरुन बुकिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरून 7588888824 वर रिफिल (REFILL) लिहून मॅसेज पाठवावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बुकिंगची माहिती मिळेल. याशिवाय तुम्ही एसएमएसद्वारे एलपीजी गॅस सिलिंडरदेखील बुक करू शकता. यामध्ये आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) मिळेल. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला दाखवून तुम्ही सिलिंडर मिळवू शकता.

HP Gas युजर्सला या WhatsApp नंबरवर करावा लागेल मॅसेज
आपण एचपी गॅस सिलिंडर बुक करू इच्छित असल्यास प्रथम आपल्या फोनमध्ये 9222201122 नंबर सेव्ह करा. असे केल्यावर, या क्रमांकाचा चॅट बॉक्स उघडा आणि BOOK टाईप करुन मॅसेज करा. हे केल्यावर, आपल्याला काही माहिती विचारली जाईल आणि आपले गॅस सिलिंडर बुक केले जाईल. यातून तुम्हाला इतर एलपीजी(LPG) कोटा, एलपीजी(LPG) आयडी, एलपीजी(LPG) सबसिडी इत्यादी बाबींविषयीही माहिती मिळू शकेल.

WhatsApp वरुन Bharatgas सिलेंडर असा करा बुक
जर आपल्याला भारतगॅस सिलेंडर बुक करायचे असेल तर आपल्याला आपल्या फोनमध्ये 1800224344 नंबर सेव्ह करावा लागेल. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करुन हा नंबर ओपन करा आणि मग बुक(BOOK) किंवा 1 लिहून मेसेज करा. यानंतर, आपले सिलिंडर बुक केले जाईल आणि आपल्या व्हॉट्सअपवर एक पुष्टीकरण मॅसेज येईल. लक्षात ठेवा की आपल्याला केवळ आपल्या नोंदणीकृत क्रमांकावरून संदेश पाठवावा लागेल.

कसा जाणून घ्याल स्टेटस?
जर आपले बुकिंग केले गेले आहे आणि आपल्याला स्टेटस जाणून घेऊ इच्छित असाल तर व्हॉट्सअप सेवेवरही ही सुविधा उपलब्ध आहे. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला STATUS # टाईप करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला आरक्षित क्रमांक मिळेल जे तुम्हाला बुकिंगनंतर मिळेल. उदाहरणार्थ, जर तुमचा बुकिंग क्रमांक 12345 असेल तर आपणास STATUS # 12345 आणि 7588888824 क्रमांकावर व्हॉट्सअप मॅसेज करावा लागेल. हे लक्षात ठेवा की STATUS # आणि ऑर्डर नंबरमध्ये कोणतीही स्पेस द्यायची नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago