क्रीडा

नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकून रचला इतिहास, 19 वर्षांनंतर देशाला मिळाले पदक

World Athletics Championships : जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा सध्या अमेरिकेतील ओरेगॉन येथे सुरू आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकून देणाऱ्या 24 वर्षीय नीरज चोप्राने भालाफेकच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. त्याने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. 39 वर्ष जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, तब्बल 19 वर्षांनंतर या चॅम्पियनशिपमध्ये देशाला पदक मिळाले आहे. नीरजच्या आधी अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. नीरज काही प्रयत्नात अपयशी ठरला होता. त्याने फाऊलही केले. तसे झाले नसते तर सुवर्णपदक जिंकले असते. मात्र, नीरजसाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे. हा भारतासाठीही आनंदाचा क्षण आहे.

नीरज चोप्रा येथे पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरला. त्याचा पहिला फेक फाऊल घोषित करण्यात आला. त्यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत ८२.३९ मीटर अंतरावर भालाफेक केली. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्याच प्रयत्नातच 90 मीटर अंतरावर भाला फेकून दबाव वाढवला. अँडरसन पीटर्सने दुसऱ्या फेरीत 90.46 मीटर भालाफेक केली. त्याचवेळी नीरजने तिसऱ्या फेरीत कामगिरीत सुधारणा करत 86.37 मीटर अंतरावर भालाफेक केली.

यानंतर नीरजचा चौथा थ्रो शानदार होता आणि त्याने 88.13 मीटर अंतरावर भालाफेक केली. इथून सुवर्णपदकासाठी नीरजला 90.46 मीटरपेक्षा जास्त भालाफेक करावी लागणार होती, पण ते होऊ शकले नाही. त्याने असे केले असते तर 39 वर्षे जुन्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भारताचे हे पहिले सुवर्ण ठरले असते. पाचवा आणि सहावा थ्रो नीरजचा फाऊल होता आणि त्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. आणि ग्रेनेडाच्या अँडरसनने सुवर्ण जिंकले.

झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेचने 88.09 गुणांसह कांस्यपदक जिंकले. दुसरीकडे, भारताच्या रोहित यादवने अंतिम फेरीत दहावे स्थान पटकावले. तिसऱ्या फेरीनंतर तो बाहेर पडला. त्याने पहिल्या फेरीत 77.96 मीटर, दुसऱ्या फेरीत 78.05 आणि तिसऱ्या फेरीत 78.72 मीटर भालाफेक केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago