राजकारण

उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, शिवसेना फुटण्याचे श्रेय त्यांनाच – राज ठाकरे

मुंबई : ”उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही, तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. उद्धव बोलतात एक व करतात दुसरेच. शिवसेनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे, तर स्वतः सेना नेतृत्वाला जात असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. ते शक्यच नव्हते. शिवसेनेकडे एक पक्ष म्हणून पाहू नका. बाळासाहेब होते तोपर्यंत माणसे एका विचाराने बांधली गेली होती. बाळासाहेब होते तोपर्यंत एक विचार होता आणि त्या विचाराने माणसे बांधलेली होती. शिवसेनेची वाटचाल ऱ्हासाकडे सुरू झाली आहे. त्यामुळे हळहळ करण्यात अर्थ नाही.

राज पुढे म्हणाले की, सद्य:स्थितीत ‘मातोश्री’ संकटात असल्याचा दावा केला जात आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. मातोश्री एक वास्तू आहे. त्यावर कोणतेही संकट नाही. वास्तू व संघटना वेगळी असते. सध्या संघटना म्हणजे शिवसेना लयास जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्यामुळे सेनेत बंडखोरी झाली नाही. त्यांचा यात काय संबंध? ते रोज सकाळी टीव्हीवर येतात, अहंकारात काहीतरी बोलतात. ते तेवढ्यापुरते होते. त्यांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नाहीत.

उद्धवमुळे शिवसेना फुटली
राज यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी चांगले मित्र आहोत. मला भेटण्यासाठी फडणवीस घरी आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटले की, उगाच फुकटचे श्रेय तुम्ही घेऊ नका. त्यावर ते जोरजोरात हसायला लागले. जी गोष्ट घडली ती ना फडणवीसांनी घडवली, ना अमित शहा यांनी घडवली, ना भाजपने, ना अजून इतर कोणी घडवली. शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांना जाते. हे काही शिवसेनेमध्ये एकदा घडलेले नाही. आजपर्यंत अनेक मोठे नेते, आमदार बाहेर पडले. मी बाहेर पडलो होतो, तेव्हाची आणि आताचीदेखील कारणे एकच आहेत. या संपूर्ण गोष्टीला उद्धव जबाबदार आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago