क्रीडा

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या डाव्या हाताचा अंगठा निखळला; गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन उतरणार मैदानात

सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. ऋषभ पंत आणि पुजारा यांनी केलेल्या फलंदाजीमुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. निर्णायक क्षणी पंत ९७ धावांवर झेलबाद झाला. मैदानावर तग धरुन असलेल्या पुजारानं एक बाजू लावून धरली आहे. दुसऱ्या बाजूला हनुमा विहारी आहे. मात्र आतापर्यंत हनुमा विहारीला या मालिकेत लौकिसास साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाची फलंदाजाची ही अखेरच जोडी असेल. त्यानंतर गोलंदाज येतील. जाडेजाला पहिल्या डावांत फलंदाजीदरम्यान दुखापत झाली होती. गरज पडल्यास जाडेजा दुखापतीनंतरही मैदानावर उतरणार, असल्याचं वृत्त आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जाडेजानं आपल्या अष्टपैलू फंलदाजीमनं सर्वांची मनं जिंकली आहेत. जाडेजानं एकहाती सामनेही फिरवले आहेत. भारतीय संघाला गरज पडल्यास दुखापतग्रस्त जाडेजा मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘भारताला कसोटी वाचवायची असल्यास, जडेजा वेदनाशामक इंजेक्शन घेऊन मैदानात फलंदाजीस उतरण्याची शक्यता आहे,’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जाडेजानं चार बळी घेतले होते. फलंदाजी करताना मिचेल स्टार्कने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू टोलावताना जडेजाचा अंगठा दुखावला गेला. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. जडेजाला बरा होण्यासाठी ४ ते ६ आठवडय़ांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago