ग्लोबल

भारतीय बनावटीच्या कोरोना लसींना जगभरातून मागणी, ९ देशांनी मागितली मदत;

दिल्ली : जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला अ‍ॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी बोलसोनारो यांनी केली आहे. मात्र भारताने करोनासंदर्भातील जे धोरण तयार केलं आहे त्यानुसार सर्वात आधी भारत आपल्या शेजरच्या देशांना करोनाची लस देणार आहे. त्यानंतर जगभरातील इतर देशांमध्ये करोनाची लस पाठवली जाणार आहे.

भारताने करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझील, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांनी भारताकडे करोनाच्या लसीची मागणी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत इतर देशांना करोनाच्या लसीचा पुरवठा करताना शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देणार आहे. त्यामुळेच बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना भारत आधी लसींचा पुरवठा करणार असल्याचे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे.

भारतीय लसींचा दर्जा, गुणवत्ता आणि परिणामकारकता पाहता जगभरातून या लसींना मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच या पूर्णपणे मेड इन इंडिया लसींचे जगभरात वितरण करण्यासाठी भारत सज्ज झाला असून भारतातील लसीकरणाच्या पहिल्या काही टप्प्यांनंतर या लसींच्या निर्यातील संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच भारत हा करोना लसीकरणामध्ये जागतिक केंद्र होण्याची शक्यता आहे.

भारतीय बनावटीच्या करोना लसींचे चीननेही कौतुक केलं आहे. दक्षि्ण आशियातील आमच्या शेजराच्या देशानी तयार केलेली करोना लस ही गुणवत्तेच्या बाबतीत कोणत्याही लसीपेक्षा कमी नाहीय, असं चीनने म्हटलं आहे. चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखामध्ये भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या करोनाच्या लसी या चीनच्या करोना लसी इतक्याच प्रभावी असल्याचे म्हटले आहे. संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भारताच्या करोना लसी या उत्तम असल्याचेही या लेखात म्हटलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

17 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago