भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सध्याच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. न्यूझीलंडच्या मध्यमगती गोलंदाजानेही रोहितची स्तुती केली.
न्यूझीलंडचा मध्यमगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने स्पोर्ट्सकीडाला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला गोलंदाजी करण्यासाठी अवघड असा फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला होता. त्यावर फर्ग्युसन म्हणाला, “मला काही फलंदाजांना गोलंदाजी करणं अवघड वाटतं. पण त्यातही रोहित शर्माला गोलंदाजी करणं सर्वात आव्हानात्मक आहे. जर तुम्ही रोहित शर्माला लवकर बाद केलं नाहीत, तर त्याने मोठी खेळी केलीच समजा. तो अतिशय प्रतिभावंत फलंदाज आहे.”
“स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली हे फलंदाजदेखील जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांना गोलंदाजी करणंदेखील कठीण असतं. पण जेव्हा तुम्ही वरच्या फळीतील फलंदाजांना लवकर बाद करता तेव्हा तुम्हाला मधल्या आणि तळाच्या फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळते आणि बळी मिळण्याची शक्यता मिळते”, असे फर्ग्युसन म्हणाला.
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…