IPL double header: Chennai-Bangalore match this afternoon, Delhi-Hyderabad match tonight
IPL २०२१ : आज होणाऱ्या डबल हेडर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. मुंबई येथे होणारा हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. तर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रात्री ७.३० वाजता सामना खेळला जाईल.
विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरू संघाने हंगामात आतापर्यंतचे सर्व 4 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर सीएसकेने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. पॉईंट टेबलमध्ये आरसीबी अव्वल आहे, तर सीएसके नंबर -2 वर आहे. चेन्नई संघाने बंगळुरूवर नेहमीच वर्चस्व राखले आहे. आतापर्यंत दोघांमधील 27 सामन्यांमध्ये सीएसकेने 17 तर आरसीबीने केवळ 9 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिश्चित होता.
आज डबल हेडरच्या दुसर्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. या हंगामात चेन्नईत खेळला जाणारा हा शेवटचा सामना असेल. दिल्ली सध्या ४ पैकी ३ सामन्यांत विजय मिळवून 6 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर हैदराबादची टीम 4 सामन्यांमध्ये २ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
मागील मोसमप्रमाणे दिल्लीची टीम या वेळी चांगल्या लयीत दिसत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीने चेन्नई आणि मुंबई पंजाब या संघांचा पराभव केला आहे. मात्र राजस्थानकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
डेव्हिड वॉर्नरचे अवघा 1 षटकार मारताच आयपीएल कारकिर्दीत 200 षटकार पूर्ण होणार आहेत. याखेरीज त्याने आज अर्धशतक ठोकले तर स्पर्धेत त्याच्या नावे 50 अर्धशतक पूर्ण होतील. तसेच वॉर्नर टी -20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यापासून अवघ्या 46 धावा दूर आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…