क्रीडा

IPL 2022 : आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात सामना

पुणे : पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स हे संघ आज संध्याकाळी 7:30 वाजता आमनेसामने येतील. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, (MCA) पुणे येथे होणार आहे. दोन्ही संघांकडे महान खेळाडूंची फौज आहे. यापूर्वी पंजाबने चेन्नईविरुद्धचा सामना जिंकून जोरदार पुनरागमन केले आहे. तर दुसरीकडे, लखनौने हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली आहे.

प्रत्येक हंगामात पंजाबची एकच समस्या असते, ते काही मोठे सामने जिंकतात आणि त्यानंतर काही सामने सहज हरतात आणि आयपीएलमधून बाहेर पडतात. कर्णधार मयांक अग्रवालला संघाला या समस्येतून बाहेर काढावे लागणार आहे. यासोबतच खेळाडूंनाही त्यांच्या जबाबदारीचे भान ठेवावे लागेल. गोलंदाजांना नियंत्रणासह गोलंदाजी करावी लागेल. अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव या जोडीने सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्यास पंजाबसाठी सामना सोपा होऊ शकतो. लखनौची फलंदाजीची फळी मजबूत आहे, त्यामुळे पॉवर प्लेमध्ये जर त्यांच्या फलंदाजांनी जास्त धावा केल्या तर त्यांना रोखणे फार कठीण जाईल.

लखनौ सुपर जायंट्स सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. दुष्मंथा चमीरा आणि आवेश खानसारखे गोलंदाज फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी देत ​​नाहीत. 145/kmph पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आतापर्यंत चमीरा संघासाठी उपयुक्त ठरला आहे. यासोबतच आवेश खान वेगवान यॉर्कर्सवर आणि ऑफ-स्टंपच्या बाहेर लोअर फुलटॉससह फलंदाजांना चकमा देण्यात यशस्वी झाला आहे.

लखनौचे गोलंदाज कोणत्याही धावसंख्येचा बचाव करण्यास सक्षम आहेत. मात्र, संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर आयुष बडोनीसारख्या युवा खेळाडूंना कामगिरीत सातत्य राखावे लागेल. केएल राहुलला पंजाबच्या संघाची रणनीती काय असेल, हे चांगल्याप्रकारे माहिती आहे, त्याचा फायदा लखनौला आजच्या सामन्यात मिळू शकतो.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago