क्रीडा

चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका, दीपक चहर स्पर्धेतून बाहेर

IPL २०२२ : इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. 14 किंवा 15 मार्चपासून सर्व संघ आपला सराव सुरू करतील. मात्र, याआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज अष्टपैलू दीपक चहर आयपीएल 2022 च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दीपक चहरला दुखापत झाली होती. दीपक चहरला IPL 2022 च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटी रुपयांना विकत घेतले. रिपोर्ट्सनुसार, दीपक चहर जर पूर्णपणे फिट झाला तर आयपीएल 2022 च्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये भाग घेणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) पूर्ण संघ-

खरेदी केलेले खेळाडू – रॉबिन उथप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायडू (6.75 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देश पांडे (20 लाख), शिवम दुबे (4 कोटी), महेश दिक्षाना (70 लाख), सिमरजीत सिंग (20 लाख), डेव्हॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी), मिचेल सँटनर (1.90 कोटी), अॅडम मिलने (1.90 कोटी), शुभ्रांशू सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख) आणि प्रशांत सोळंकी (20 लाख), भगत वर्मा (20 लाख), ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीसन (20 लाख) आणि सी हरी निशांत (20 लाख), रवींद्र जडेजा (16 कोटी), एमएस धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (6 कोटी).

IPL 26 मार्च रोजी सुरू होईल आणि 29 मे रोजी अंतिम सामना 

10 संघांची इंडियन प्रीमियर लीग 26 मार्चपासून मुंबईत सुरू होणार असून लीगचा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारी गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर सांगितले की, शनिवार, 26 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. तर अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे.

मुंबईत ५५ सामने होणार, प्ले-ऑफबाबत अद्याप निर्णय नाही
IPL 2022 च्या साखळी टप्प्यात, 55 सामने मुंबईत आणि 15 सामने पुण्यात खेळवले जातील. लीगचे सर्व सामने चार स्टेडियममध्ये खेळवले जातील. वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर 20 सामने, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 सामने आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर 15 सामने होणार आहेत. मात्र, प्ले-ऑफ सामन्यांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago