क्रीडा

IPL 2021 PBKS vs MI : मुंबईविरुद्दच्या सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय.. केएल राहुल व ख्रिस गेलची स्फोटक खेळी

चेन्नई : चेन्नईच्या चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज संघांमध्ये आयपीएल २०२१चा १७वा सामना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि ख्रिस गेलच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर १७.४ षटकातच ९ विकेट राखुन शानदार विजय मिळवला. मुंबईने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले आणि या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्याआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर १३१ धावा केल्या होत्या.

पंजाबच्या डावाची सुरूवात राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावा केल्या. मयांक २५ धावांवर बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेल आणि राहुलने विजयाचे लक्ष्य सहजपणे पार केले. राहुलने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६० धावा केल्या. तर गेलने ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. मुंबईने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले. पंजाबने या विजयामूळे सातव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सच्या गुणतक्यातील स्थानावर कोणताही फरक पडलेला नसून ते चौथ्या स्थानावर कायम आहे.

पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक हुड्डाने दुसऱ्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला ३ धावांवर माघारी पाठवले आणि मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशान किशन ६ धावांवर बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. पहिल्या १० षटकात मुंबईला फक्त ४८ धावा करता आल्या.

रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. या जोडीने संघाला १०० च्या पुढे नेले. ही जोडी पुन्हा एकदा रवी बिश्नोईने फोडली. त्याने सूर्यकुमारला ३३ धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक करणारा रोहित शर्मा ६३ धावांवर माघारी परतला. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. मधळ्या फळीतील हार्दिक पंड्या पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला आणि ४ चेंडूत एक धाव करून बाद झाला. अखेरच्या चार षटकात मुंबईला फक्त २६ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर केवळ १३१ धावा करता आल्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago