क्रीडा

ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट जगभरात आलेली असताना ऑस्ट्रेलियाने अतिशय सावध पण कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतणं अवघड होणार आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्टनुसार मायदेशी परतल्यानंतर आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं जाईल. तसंच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंडही घेतला जाईल. एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही तर त्यांना जेलही होऊ शकते.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या या भयाण परिस्थितीत सरकारी नियम पायदळी तुडवून भारतातून ज्यांनी कुणी ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश केला आहे, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा तसंच दंड आकारण्याचा ऑस्ट्रेलियन सरकार विचार करत आहे. ऑस्ट्रेलियाचे 14 खेळाडू सद्यस्थितीत आयपीएल खेळत आहेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, पॅठ कमिन्स यांचा समावेश आहे. त्याचसोबत आयपीएलच्या विविध फ्रेंचायजीमधला ऑस्ट्रेलियन कोचिंग तसंच सपोर्ट स्टाफ, टीव्ही कॉमेंटेटर यांचाही समावेश आहे. यामध्ये दिग्गज माजी खेळाडू रिकी पाँटिंग, ब्रेट ली, मॅथ्यू हेडन या महत्त्वाचा क्रिकेटर्सचा समावेश आहे.

नाईन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या परिस्थितीत भारतातून जो कुणी ऑस्ट्रेलियात येईल त्याला ऑस्ट्रेलियन सरकार गुन्हेगार म्हणून त्याच्याकडून अधिकाधिक 66 हजार डॉलरचा दंड आकारेल तसंच एवढ्यावरच हे थांबणार नाही तर त्याला 5 वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आयपीएल खेळाडूंना याआधीच दणका दिलाय. खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारता गेले आहेत. म्हणजेच ते त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी भारतात गेले आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:च्या मायदेशी परतावं लागेल, असं स्पष्टीकरण देत मुंबईकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रायव्हेट विमानाची मागणी त्यांनी फेटाळून लावली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

10 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago