क्रीडा

IPL 2020 : शेवटचा डबल हेडर, प्ले-ऑफच्या शर्यतीत आजचे सामने ठरणार निर्णायक, जाणून घ्या संघांविषयी..

आज आयपीएलचा शेवटचा डबल हेडर (एका दिवसात 2 सामने) आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुपारी ३.30 वाजता अबू धाबी येथे सामना रंगेल. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुबई येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल.

पंजाबचे १३ सामन्यांत १२ गुण आहेत. चेन्नई आधीच प्ले-ऑफ रेसमधून बाहेर पडली आहे. चेन्नईने हा सामना जिंकल्यास पंजाबसाठी प्ले-ऑफचे दरवाजे पूर्णपणे बंद होतील. कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. अशा परिस्थितीत, जो संघ हा सामना गमावेल तो स्पर्धेमधून बाहेर जाईल.

मागच्या सामन्यात चेन्नईने पंजाबला 10 गडी राखून पराभूत केले. मोसमातील 12 व्या सामन्यात कोलकाताने राजस्थानला 37 धावांनी पराभूत केले.

राजस्थान रॉयल्सचा सक्सेस रेट 50.94% आणि कोलकाताचा सक्सेस रेट 51.83% इतका आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत लीगमध्ये 160 सामने खेळले असून 81 सामने जिंकले आणि 77 गमावले. 2 सामने अनिश्चित होते. त्याचबरोबर कोलकाताने आतापर्यंत 192 पैकी 98 सामने जिंकले आणि 93 गमावले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा सक्सेस रेट सर्वाधिक 59.60% आहे. पंजाबचा सक्सेस रेट 46.03% आहे. चेन्नईने आतापर्यंत लीगमध्ये एकूण 178 सामने खेळले आहेत. त्यापैकी 105 जिंकले आणि 72 सामने गमावले आहेत. 1 सामना अनिर्णीत होता. दुसरीकडे, पंजाबने आतापर्यंत 189 सामने खेळले आहेत. त्यापैकी 88 जिंकले आहेत आणि 101 गमावले आहेत.

अबू धाबी आणि दुबईमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. अबू धाबीमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देईल. त्याचबरोबर दुबईमध्ये नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago