भारताचा 23 वर्षीय टेनिस स्टार सुमित नागलने इतिहास रचला आहे. गेल्या सात वर्षात यूएस ओपनच्या दुसर्या फेरीत प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. नागलचा दुसर्या फेरीत पुढचा सामना ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम किंवा स्पेनच्या जौम मुनारशी होईल. याआधी, सोमदेव देववर्मनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला होता.
यूएसचा प्रतिस्पर्धी ब्रॅडले क्लान याला मंगळवारी (1 सप्टेंबर)पराभवाची धूळ चारत नागलने यूएस ओपनच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला. 6-1, 6-3, 3-6, 6-1 अशा सेटमध्ये सुमित नागलने विजय मिळवला. नागलने क्लानविरुद्ध सामन्याच्या सुरुवातीच्या दोन सेटमध्ये 6-1, 6-3 असा धमाकेदार विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये, क्लानने नागलवर मात केली आणि सामना उत्कंठावर्धक स्थितीत आला. त्यानंतर सुमितने पुन्हा चौथ्या सेटमध्ये बाजी मारत 6-1 अशी आघाडी मिळवली. सुमित गेल्या सात वर्षांत ग्रँड स्लॅम एकेरीतील मुख्य सामना जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…